Posts

Showing posts from June, 2021

११. अगोदर रोगनिदान करताना चुका; नंतर वैद्यकीय प्रक्रियांमध्ये त्रुटी..

 प्रकरण चार: भाग २ अगोदर रोगनिदान करताना चुका; नंतर वैद्यकीय प्रक्रियांमध्ये त्रुटी.. २०१८ च्या सुरुवातीलाच मला मुख्य नेफ्रोलॉजिस्ट यांनी, किडनी ट्रान्सप्लांटला मान्यता मिळवण्यासाठीची प्रोसेस सुरु करण्यासाठी लेटर दिले होते. परंतु त्या हॉस्पिटलमध्ये काही सरकारी ऑफिसप्रमाणे, लाल फितीचा कारभार आढळत होता. प्रोसेस अतिशय संथगतीने सुरु होती. काही डॉक्टर्स ज्यांची किडनी ट्रान्सप्लांट साठी परवानगी हवी होती ते वेगळ्या प्रकारे प्रोसेसला वळण देत होते. कोऑर्डिनेटर कधी चांगला डॉक्टर असायचा, तर कधी त्याला बदलून सतत ओरडणारा डॉक्टर असायचा. आम्ही कंटाळून गेलो होतो. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे मग सप्टेंबर अखेर डायलिसिस सुरु झाले होते. तेव्हा काही प्रकार घडले. आम्हाला ॲडमिशन हवी होती म्हणून आम्ही मिळेल तो बेड स्विकारला होता. तिथे हेड नर्सने अननुभवी नर्सला आणले व त्रास झाला होता. नंतर स्पेशल रुममध्ये, मला व कुटुंबियांना, नर्सेस, ब्रदर्स व स्टाफ मेंबर्स; यांचा खूपच चांगला अनुभव आला होता. त्यांच्यामध्ये कमालीचा प्रोफेशलीझम अर्थात व्यावसायिकता  होती. नंतर मानेमध्ये कॅथेटर बसवण्यासाठी पाच तास लॉबीमध्ये थंडी

१०. कधीच ' नाही'पेक्षा उशीरा पाऊल उचललेले चांगले!

प्रकरण तीन Better late than never.. भाग १ आपल्या आलेल्या सूचनांचा मान ठेवत, मी २०११ ते २०१८ पर्यंतचा, अर्थात डायलिसिस सुरु होईपर्यंतचा वैद्यकीय प्रवास लिहिण्यास सुरुवात करत आहे. मी सुरुवात तारखेनुसार केली, पण कित्येक डझन्स मेडिकल फाईल्स व शेकडो मेडिकल टेस्टचे रिपोर्ट्स आहेत. त्यात तारखा शोधून लिहिण्यात वेळ जाऊ लागला. म्हणून मी ठरवले की जेवढे आठवते आहे तेवढे अगोदर लिहून काढू या. आणि नंतर जेव्हा कागदोपत्री पुस्तक प्रसिद्ध करायची वेळ येईल, तोपर्यंत योग्य तारखा शोधून त्या पुस्तकात नमूद करू या. २००४ मध्ये माझा creatinine हा १.४ होता. मला कल्पना सुद्धा नव्हती, creatinine म्हणजे काय आहे आहे? तरीसुद्धा माझा नियमित योगा व व्यायाम आणि थोडेफार डायटिंग; यामुळे creatinine, २०११ पर्यंत १.५ होता. ही योग्य वेळ होती, Nephrologist ना भेट देण्याची.. पण Nephrology हा प्रकार सुद्धा माहित नव्हता. डॉक्टरांनी ही फक्त ब्लडप्रेशर च्या गोळ्या चालू ठेवल्या होत्या. २ नोव्हेंबर २०११ पासून माझ्या डॉक्टरानी (जनरल प्रॅक्टिशनर) 'नेफरोसेव' ही एकमेव, creatinine वरील उपायासाठी, गोळी सुरु केली. २१ नोव्हेंबर २०११ ला

९. संवाद तुमच्या माझ्यामधील: श्रद्धा व सबूरी

 संवाद तुमच्या माझ्यामधील     श्रद्धा व सबूरी या वेळी थोडा जास्त ब्रेक घेतला. अनेक मित्रमैत्रिणींच्या वैयक्तिक प्रतिक्रिया आल्या होत्या व येत आहेत. सर्वात प्रथम, अनेक जणांच्या मते, 'मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट' या पुस्तकाशी जोडले जात असतानाच, मध्येच 'हेवा', 'मत्सर' व 'द्वेष' ही तीन लेखांची मालिका आली. बहुतेक जणांनी पुस्तकाचाच भाग समजून वाचायला सुरुवात केली व गोंधळ उडाला. व्यावसायिक रित्या ऑनलाईन समुपदेशन (counseling) वा Personal Mentoring करत असताना, अनेक वेळा काही विचारांशी जोडला जातो. आणि त्या वेळी जाणवते की, या विचारांचा फायदा जास्तीत जास्त जणांना झाला पाहिजे. मग ते विचार शक्य तितक्या विस्तृतपणे (जास्त विस्तार टाळून) लिहून काढतो व सरळ सोशल मीडियावर प्रसिद्ध करतो.  खरं तर, व्यक्तीगत समुपदेशन (counseling) व  मग , मार्गदर्शन (Mentoring) मध्ये त्या त्या व्यक्तीशी निगडित तपशील माहीत असतो.  इथे मर्यादा ही असते की प्रत्येक जण त्या विचारांचा काय अर्थ काढतो, ते समजत नाही. काही जवळच्या मित्रमैत्रिणींमुळे झालेला गोंधळ लक्षात आला. आताही काही विषयांवर लेखन

विशेष विनंती:

 वाचक मित्रमैत्रिणींनो, नमस्कार! 'मी परिपूर्ण (perfect) आहे', असे कुणीही (मी पण) ठामपणे सांगू शकत नाही. तसेच कोणतीही संस्था वा कंपनी सुद्धा सांगू शकत नाही. प्रत्येक संस्थेमध्ये/कंपनीमध्ये, चांगली, वाईट व पाट्या टाकणारी माणसे असतात. त्यातील एका घटकामुळे, आपण पूर्ण संस्थेला एक लेबल लावू शकत नाही.  चांगुलपणा जास्त असेल तर तशी इमेज होत जाते. वाईटपणा जास्त असेल तर तशी इमेज होत जाते. माझ्या एकट्याच्या अनुभवांवरुन, कोणत्याही हॉस्पिटलला किंवा डॉक्टरांना, आपण पूर्ण 'चांगले' वा पूर्ण 'वाईट' ठरवू शकत नाही. माझ्यासाठी ते अनुभव चांगले वा वाईट होते.  हॉस्पिटलच्या ट्रस्टींनी व व्यवस्थापनाने ठरवायला हवे की वाईट अनुभवांच्या आधारावर, त्यांनी काय निर्णय घ्यायला हवे. जर त्यांनी दुर्लक्ष केले किंवा चुकीचं वागणाऱ्यांना पाठीशी घातले, तर भविष्यात त्यांना ते जास्त धोकादायक ठरु शकते. One cannot run tomorrow's organizations on yesterday's assumptions. - Business Growth माझी अपेक्षा आहे की, मी जिथे सावधगिरी बाळगली नाही किंवा जिथे गोष्टींना गृहित धरले; त्या चुका आपण कृपया टाळाव्यात

८. पेशंट सुद्धा ग्राहक आहे..

 मी किडनी डायलिसिस व ट्रान्सप्लांट ग्राहक आहे म्हणून व्यवसाय आहे.. पेशंट सुद्धा ग्राहक आहे.. पुढे चालू.... मला जो बेड मिळाला होता, ती अत्यंत छोटी जागा होती. मेडिकल उपकरणे बऱ्यापैकी होती. रात्री उशिरा, हेड नर्स एका अत्यंत तरुण नर्सला घेऊन आल्या. माझ्या हातामध्ये, योग्य नस ओळखून तिथे Intravenous (IV) cathetar लावायचा होता. अनेस्थेसिया, पेनकिलर्स, ॲंटिबायोटिक्स आणि इतर महत्त्वपूर्ण द्रवपदार्थांचे संचालन करण्यासाठी, डॉक्टर आणि नर्स IV थेरपीचा वापर करतात.   शस्त्रक्रियेदरम्यान, आयव्ही तयार करुन ठेवलेले असल्यास, आवश्यकतेनुसार आपत्कालीन योग्य औषधे, त्वरित आणि कार्यक्षमतेने दिली जाऊ शकतात. मी हेड नर्सना विचारले, हिला अनुभव आहे काय? त्या हेड नर्स यांनी, माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन, त्या तरुण अननुभवी नर्सला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. तेव्हा मी व माझ्या पत्नीला लक्षात आले की, माझा गिनीपिग अर्थात बळीचा बकरा म्हणून वापर केला जाणार होता. नंतर त्या अननुभवी नर्सने सुई हातात टोचली आणि माझ्या तोंडातून अस्पष्ट किंकाळी बाहेर आली. अनुभवी व महत्वाचे म्हणजे, कौशल्य आणि संवेदनशील नर्स अत्यंत प्

७. स्विकार: आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पहिले पाऊल

 मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट स्विकार:  आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पहिले पाऊल २०१२ मध्ये तो दिवस उजाडला, जेव्हा मला माझ्या दोन्ही किडनींच्या अवस्थेबद्दल समजले. परमेश्वराच्या कृपेने, आयुष्यात व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक, अशा सर्व बाजूंनी सुख अनुभवत असताना, हा धक्का मिळाला. थोडे दिवस मी त्या धक्क्याने बावरलो होतो. पण, जेव्हा लक्षात आले की, 'पिक्चर अभी बाकी हैं'; तेव्हा ठरवले, उर्वरित पिक्चर धमाल जगायचा.. पुढे चालू.... २०१२ नंतर मी थोडा योग, थोडासा व्यायाम व खूप सारे डायटिंग; यावर भर दिला. त्याचा परिणाम म्हणून क्रिएटाइन लेवल मर्यादित राहिला. पण, किडनींची ट्रिटमेंट सुरु झाल्यानंतर, काही काळानंतर, माझे क्रिएटाईन ४ घ्या वर गेले होते. तेव्हा, सौ. प्रिती आरोलकर, यांनी डायटिशिअन म्हणून अप्रतिम रितीने डायट प्लॅन आखून दिला होता. त्यामुळे माझी क्रिएटाईन लेवल चारवरुन, दोनपर्यंत आली होती. माझ्यावर इलाज करणारे, नेफ्रॉलॉजीस्ट सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. पण नंतर, सौ. प्रिती आरोलकर, त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी स्विकारली. आता त्या फक्त त्या कॅन्सर रु

६. नाण्याच्या दोन बाजू

 मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट १९९६ ते २०१२ व तद्नंतर २०१२ ते २०१८, हा कालावधी माझ्या व्यावसायिक यशासाठी खूपच महत्वाचा आहे. या कालावधीत मी पराकोटीचे यश व अपयश, दोन्ही पाहिले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयुष्यातील सर्वात मोठा दुःखाचा क्षण, जो आयुष्यभरासाठी चटका देऊन गेला, तो सुद्धा याच कालावधीत अनुभवला होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, २०१२ पर्यंत, सर्व काही सुरळीत चालले आहे. यामुळेच कधी डॉक्टरांचा दुसरा पर्याय शोधावा, असा विचार सुद्धा मनाला स्पर्श करुन गेला नाही. १९९८_९९ मध्ये, नोकरी सोडल्यानंतर, हळूहळू 'प्रसन्न प्रशिक्षणक्रम' बॅचेसची संख्या वाढत गेली. सुरुवातीला प्रसन्न प्रशिक्षणक्रमाची रविवारी फक्त एक बस होती. मग हळूहळू दर रविवारी दोन, मग शनिवार-रविवार म्हणून तीन, मग आठवड्यात पाच, नंतर सहा व शेवटी आठवड्याला सात बॅचेस सुरु झाल्या.  हा पसारा वाढत असताना माझे मित्र प्रसन्न श्री. संदेश आचरेकर यांनी मला मोरारजी मेल्स मध्ये व्हाईस प्रेसिडेंट लेव्हलला 'स्ट्रेस मॅनेजमेंट' हा दोन दिवसाचा कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याची संधी दिली.  त्यानंतर श्रीयुत राजन महाडिक या

५. अज्ञानात सुख असते?

 II श्री साईनाथाय नमः II  १९९७ ते २०१२ या काळात माझी किडनी आतून हळूहळू खराब होत होती. पण मला त्याची कल्पना नव्हती. मी त्या बाबतीत अज्ञानी होतो. म्हणजे खरोखरच दरवेळी,अज्ञानात सुख असते का? उलट जर मला त्यावेळेस कळले असते, तर मी त्यावर योग्य उपचार करवून घेतले असते. माझा यशाचा आलेख जो या काळात वर वर जात होता, त्यात थोडासा वेग कमी झाला असता. पण नंतर जास्त वेगाने मला पुढे जाता आलं असते.  १९९७ ते २०१२, हा काळ माझ्यासाठी कौटुंबिक दृष्ट्या, व्यावसायिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या; तसेच ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय चांगला होता. १९९७ मध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर, जे काही दिवस मी घरी होतो; ते दिवस मी कुटुंबासमवेत आरामात घालवले. त्याच दिवसात, अचानक एक दिवस माझा श्री. मित्र प्रकाश राठोड घरी येऊन थडकला. तो आल्यानंतर, मी बेडवर झोपलो होतो; तिथे येऊन बसला व माझ्याशी थोडावेळ बोलला. मग किचनमध्ये जाऊन त्याने सुप्रियाला बाहेर काढले आणि मग माझ्यासाठी तो फ्रेश चिकन घेऊन आला होता, त्याचे त्याने चिकन सूप बनवले. सूप झाल्यानंतर थोडेसे थंड होऊ दिले आणि नंतर एका बोलमध्ये घेऊन माझ्या बेडजवळ येऊन मला चमचा चमचा अ

आवाहन

 आपण कृपया हा ब्लॉग लाईक केलात व यातील पोस्ट्स शेअर केल्या; तर अनेक जणांना तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याचे धोके व सजग राहण्याचे महत्व कळण्यास मदत होईल. 'दुनियॉं हे कितना गम हैं, मेरा गम कितना कम हैं...' याची सुद्धा कल्पना येण्याची शक्यता वाढते. परमेश्वरावरील श्रद्धा, आईवडिलांचा आशीर्वाद, कुटुंबाची साथ, मोजक्या का होईना, खऱ्या मित्रमैत्रिणींचे महत्व, संयम, धाडस, चिकाटी इत्यादी गुण.. अशा घटकांमधून पुराव्यानिशी लाभलेली अंतर्दृष्टी व त्यातून जाणवणारा फरक लक्षात येऊ शकतो. आपले सहकार्य अपेक्षित आहे. 🙏🙏

४. अतिविश्वास, गैरसमज व मोजलेली किंमत

 मी, किडनी डायलिसिस व ट्रान्सप्लांट मला सल्फाची ॲलर्जी आहे, हे समजून येण्यासाठी, मला फार मोठी किंमत मोजावी लागली होती. पण नंतर १९९७ पासून माझे ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब, हळूहळू वाढू लागला. डॉक्टरांच्या मते माझा व्यवसायाचा व्याप वाढत होता, त्यामुळे त्याचा परिणाम ब्लडप्रेशर वर होत होता.  'डॉक्टर म्हणजे देव!'  ते सांगतील ते ऐकायचे, या नियमाने मी दर महिन्याला जाऊन त्यांना भेटत होतो. त्यांनी सांगितलेली औषधे घेत होतो. त्यांनी सांगितलेल्या टेस्ट करत होतो.  २००४ नंतर मध्ये मध्ये जेव्हा पायावर सूज येत होती. तेव्हाही डॉक्टर म्हणायचे, हे ब्लड प्रेशर मुळे होत आहे. असे करता करता पंधरा वर्षे गेली. २०१२ मध्ये मी बिझनेस टूरवर होतो. त्यावेळेस मला दिवसभर काही खाता आले नव्हते.  परत आल्यानंतर मला लगेच दुसऱ्या टूरला जावे लागले. तिथे मी तीन दिवस होतो. तिथेही बरं वाटत नव्हतेच. पण तेव्हा इच्छाशक्तीच्या जोरावर ते तीनही दिवस मी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतले. पण परत येताना मला खूप त्रास होऊ लागला. जेव्हा मी घरी पोचलो, त्यावेळेस मी गलितगात्र झालो होतो.  दुसऱ्या दिवशी माझी पत्नी सुप्रिया जेव्हा मला त्य

३. फ्लॅशबॅक

मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट मला गंभीर स्वरूपाचे डिहायड्रेशन झाले होते, त्यावेळेस आमचे फॅमिली डॉक्टर शहा यांनी मला चेंबूरला एक जनरल फिजिशियन आहेत त्यांच्याकडे पाठवले होते. गोरेगोमटे, थोडे स्थूल असलेले व चेहऱ्यावर हास्य असलेले ते डॉक्टर पहिल्या भेटीत आवडले. त्यांनी मला ॲडमिट न करुन घेता, औषधे गोळ्या दिल्या. त्यामुळे मला दुसऱ्या दिवशीच अतिशय बरे वाटले. त्यांच्यावरचा विश्वास वाढला. ते जनरल फिजिशियन असलेले डॉक्टर, वागायला-बोलायला सुद्धा अतिशय चांगले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर रॅपो जुळला. मग त्यांच्याकडे घरातील कुणाच्याही आजारानिमित्त जाणे-येणे वाढले.  नंतर मी कल्याणला शिफ्ट झालो होतो आणि एकदा तापावर औषधे घेण्यास गेलो होतो. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊन, मी कल्याणला माझ्या घरी गेलो आणि गोळ्या घ्यायला सुरुवात केली.  पहिल्या दिवशी गोळ्या घेतल्या आणि नंतर माझ्या शिश्नावर लाल चट्टे उमटले. माझ्या लक्षात नाही आले, की हे गोळ्यांमुळे होते आहे. परत दुसऱ्या दिवशी मी गोळ्या घेतल्या. तेव्हा शिश्नाच्या आजुबाजूची कातडी फाटायला लागली. तिसऱ्या दिवशी गोळ्या घेतल्या. आणि नंतर त्या फाटलेल्या कातडीतून

२. दुसरी इनिंग

 मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट: वळण: क्षणात बदललेलं आयुष्य पुढे चालू.. त्याक्षणी आम्ही नवराबायको हतबल झालो होतो. पण घरी आल्यावर देव्हाऱ्यात दिवा लावला. आणि परमेश्वराची हात जोडून प्रार्थना केली. मग ठरवले की आपण किडनी तज्ञांना भेटून नेमके निदान करु या. म्हणून आम्ही माहीम येथील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हते कि किडनी विकारांसाठी असणाऱ्या डॉक्टरांना 'नेफ्रोलॉजिस्ट' संबोधतात.  जाताना सुद्धा, आता काय ऐकायला मिळेल, याची धास्ती होती. पण तेथील नेफ्रोलॉजीस्ट यांनी अगोदर आम्हाला धीर दिला.              त्यांनी समजावून सांगितले की "अजून तुमच्या दोन्ही किडनी पूर्ण निकामी नाही झाल्या आहेत, पण त्या निकामी होण्याच्या मार्गावर आहेत. तुम्ही अगोदरच यायला हवे होते."  "२००४ मध्ये तुमची क्रिएटाइन लेवल वाढली होती. तेव्हाच तुमच्या डॉक्टरांनी, जे जनरल प्रॅक्टिशनर आहेत, त्यांनी तुम्हाला आमच्याकडे अर्थात नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंटकडे पाठवायला हवे होते. तेव्हा तुम्ही क्रोनिक किडनी डिसीजचे रुग्ण नव्हता. तेव्हा तुमच्या किडनी वाचवता

१. वळण: क्षणांत बदललेले आयुष्य

 प्रकरण एक वळण: क्षणांत बदललेले आयुष्य २०१२: "बिपिन, तुझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत." डॉक्टरांनी निर्विकारपणे सांगितले, "मी आता काहीही करु शकत नाही."  ते ऐकून आम्हाला क्षणभर विश्वास बसेना. आम्ही डॉक्टरांकडे बघत राहिलो. पण नेहमी हसतमुख गप्पा मारणारे वरिष्ठ डॉक्टर आज निर्विकार होते.  गेली पंधरा वर्षे आम्ही ज्यांच्यावर विसंबून राहिलो व ज्यांच्या विश्वासावर आम्ही निर्धास्त होतो, तेच डॉक्टर आज अचानक दोन्ही किडनी निकामी झाल्याचे सांगत होते. आम्हाला समजत नव्हते, दोन्ही किडनी निकामी होईपर्यंत डॉक्टर काय करत होते?  त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच धोक्याची सूचना द्यायला हवी होती. जेणेकरुन आम्ही योग्य ती उपाययोजना करुन एक तरी किडनी वाचवली असती. आम्ही खिन्नपणे त्यांच्या ओपीडी रुममधून बाहेर पडलो. उद्या पुढे चालू....

प्रस्तावना

 प्रस्तावना डॉक्टर असलेले डॉ. लालचंद शहा यांच्यामुळे, 'डॉक्टर म्हणजे देव !' हा समज बालमनावर ठसत गेला होता. डॉ. शहा आमचे केवळ कौटुंबिक डॉक्टर नव्हते तर कौटुंबिक मित्र होते व आहेत.  आमच्या जुन्या घरापासून त्यांचा दवाखाना पाच मिनिटांच्या अंतरावर होता. सतत दाढीमिशी सफाचट केलेले (आजही) उंचेपुरे, गोरेपान व सतत हसतमुख अशा डॉ. शहांना पाहून आजार अर्धा बरा व्हायचा.  सर्दी, खोकला व ताप असे आजार असतील, तर आम्हाला तेव्हापासून आजही खात्री असते की डॉक्टरांच्या औषधांनी आम्ही एका दिवसात बरे होणार व होतो सुद्धा! मग तो प्लासिबो इफेक्ट असेल किंवा काहीही! आमचा डॉक्टरांवर विश्वास होता व आहे. डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर मस्त गप्पा मारायचे व आजही आमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बाबींची चर्चा करतात, विचारपूस करतात. जास्त गरज लागली तर त्यांना घरी बोलवावे लागे. ते सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता घरी येत. जो कुणी आजारी असेल त्याची नीट विचारपूस करुन औषध देत व परिवारातील सगळ्यांची चौकशी करत (आजही करतात. फक्त वयपरत्वे व सद्यस्थितीत घरी येऊ शकत नाही). हाच अनुभव आमच्या जुन्या इमारतीमधील व वसाहतीमधील बहुतेकांचा आहे

दोन शब्द समर्पणाचे

 दोन शब्द समर्पणाचे:  माझा भाऊ श्री सतीश मयेकर, याचा मी अत्यंत ऋणी आहे. त्याचे उपकार मी कोणत्याही प्रकारे फेडू शकत नाही. त्याने त्याची किडनी देऊन, मला पुनर्जन्म दिला आहे. किडनी देण्यापूर्वी व दिल्यानंतर सुद्धा तो अत्यंत शांत आहे कोणत्याही प्रकारचा बडेजाव मिरवत नाही. असा भाऊ परमेश्वराच्या कृपेने लाभतो. माझ्या आजारपणात, मला आईच्या ममतेने जपणारी माझी पत्नी, सौ. सुप्रिया व वडिलांप्रमाणे मला शिस्त लावणारी, माझी मुलगी कुमारी निहरिका या तिघांना मी हे पुस्तक समर्पित करत आहे. २०१२ मध्ये जेव्हा समजले की मला किडनीचा त्रास आहे, तेव्हापासून माझा दोन नंबर मोठा भाऊ सतीशदादा हा सारखा मला धीर देत असे व त्याचे म्हणणे होते, ,"तू बिनधास्त रहा. तुला गरज लागेल, तेव्हा माझी किडनी मी तुला देईन." तेव्हा आम्ही कोणत्याही टेस्ट सुद्धा केल्या नव्हत्या पण तरीसुद्धा त्याला खात्री होती की आमच्या किडनी मॅच होणार म्हणून, आणि पुढे तेच झाले. २०१८ पासून मी बेड रेस्ट वर आहे आणि त्या दिवसापासून माझ्या आजारपणात माझ्या पत्नीने आर्थिक, मानसिक, भावनिक अशा सर्व स्तरांवर माझ्या कुटुंबाला सांभाळले आहे. माझ्यासाठी तिने दि

पार्श्वभूमी

Image
 किडनी हा मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे. आजपर्यंत किडनी कडे आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होत गेले आहे. माझे नकळत का होईना, दुर्लक्ष झाले होते. तसेच सर्वसाधारण आजारांवर, माझा इलाज करणारे, जनरल फिजीशिअन यांचे सुद्धा दुर्लक्ष झाले होते. माझे ४५ वर्षांपर्यंत, हॉस्पिटलचे तोंड न बघितलेले आयुष्य, ते आता २०२१ मध्ये झालेले किडनी ट्रान्सप्लांट, तसेच त्यापूर्वीच माझ्या शरीरात नकळत बिघडत गेलेले किडनीचे कार्य; काही डॉक्टरांचे दुर्लक्ष तर काही डॉक्टरांचे अथक कार्य, इतर मेडिकल स्टाफचे अनुभव, मी या ब्लॉगमध्ये लिहिणार आहे. नकारात्मक अनुभवांमध्ये, कुणाचेही नाव लिहिणार नाही. पण, कृतज्ञता म्हणून, ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी मदत केली, त्या प्रत्येकाचे नाव नमूद करण्याचा प्रयत्न करणार आहे. मधील काळात, जवळच्या व्यक्तींच्या विचित्र वागण्यामुळे कडवटपणा आला होता. पण परमेश्वराच्या कृपेने वेळीच त्यातून सावरलो गेलो. या अनुभवांतून, मी काय शिकलो व कशा प्रकारे शिकलो; यावर या ब्लॉगमध्ये भर देणार आहे. माझे आध्यात्मिक जीवन व माझा २३ वर्षांतील २९ विषयांमधील, प्रशिक्षणाचा अनुभव मला कसा उपयोगी पडला व पडत आहे, यावर स