१. वळण: क्षणांत बदललेले आयुष्य

 प्रकरण एक

वळण: क्षणांत बदललेले आयुष्य


२०१२:

"बिपिन, तुझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत."

डॉक्टरांनी निर्विकारपणे सांगितले, "मी आता काहीही करु शकत नाही." 


ते ऐकून आम्हाला क्षणभर विश्वास बसेना. आम्ही डॉक्टरांकडे बघत राहिलो. पण नेहमी हसतमुख गप्पा मारणारे वरिष्ठ डॉक्टर आज निर्विकार होते. 


गेली पंधरा वर्षे आम्ही ज्यांच्यावर विसंबून राहिलो व ज्यांच्या विश्वासावर आम्ही निर्धास्त होतो, तेच डॉक्टर आज अचानक दोन्ही किडनी निकामी झाल्याचे सांगत होते. आम्हाला समजत नव्हते, दोन्ही किडनी निकामी होईपर्यंत डॉक्टर काय करत होते? 


त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच धोक्याची सूचना द्यायला हवी होती. जेणेकरुन आम्ही योग्य ती उपाययोजना करुन एक तरी किडनी वाचवली असती. आम्ही खिन्नपणे त्यांच्या ओपीडी रुममधून बाहेर पडलो.


उद्या पुढे चालू....

Comments

Popular posts from this blog

आवाहन

९. संवाद तुमच्या माझ्यामधील: श्रद्धा व सबूरी

पार्श्वभूमी